Press "Enter" to skip to content

मनीष नांदगावकर आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •

मुरूड तालुक्यातील ग्रामीण भागात असणारी उसरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांना नवराष्ट्र नवभारत यासंस्थेकडून आदर्श सरपंच पुरस्काराने अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, आमदार अनिकेत तटकरे,आमदार जयंत पाटील,पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,मराठी अभिनेते भाऊ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

मनीष नांदगावकर यांनी गेली पंधरा वर्षे सदस्य व उपसरपंच असताना असंख्य विकासकामे केली.तसेच गत निवडणुकीत नांदगावकर हे जनतेमधून थेट सरपंच म्हणून निवडून आले आहेत.त्यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या तीन वर्षीय कारकिर्दीत ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे.त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा व विविध क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामे नवराष्ट्र तसेच इतर वृत्त संस्थेने या वृत्तपत्राच्या माध्यमातूनप्रसिद्धी देत ते जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे.

त्याचप्रमाणे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठविला. मी जे कार्य करीत आहे त्याचा लोखाजोखा घेऊन रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंचाना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.त्यामध्ये नांदगावकर यांचासुद्धा समावेश आहे. मुरुड तालुक्यातून माझी निवड करून मला सन्मानित केले.

उसरोली ग्रामपंचायत ही सदस्य संख्येने मोठी आहे मात्र उत्पन्नाच्या कमी असल्याने विकास कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत असताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील,माजी आमदार पंडित पाटील यान यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतमध्ये विकास कामांना चालना मिळाली आहे.

उसरोली ग्रामपंचायत ही मुरूड तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यात विकास कामाच्या जोरावर कशाप्रकारे नंबर एकवर येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असताना यामध्ये मला माझ्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य,ग्राम विकास अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांची मोलाची साथ लाभत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.