Press "Enter" to skip to content

स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद

मी असह्य कर्जतकर… कर्जत शहरामधील रस्त्यांवर मोकळा श्वास कधी घेणार ?

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

दिवसेंदिवस कर्जत शहरात वाहतुकीची तीव्र समस्या वाढत आहे, शहरातील मुख्य रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे उभ्या असलेल्या दुकानांच्या टप-या, हातगाड्या, रिक्षा यामुळे जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, पादचारी यांना शहरातील रस्त्यांवरून चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे नगरपरिषद प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे कर्जत विकास संघर्ष समितीने “मी असह्य कर्जतकर” स्वाक्षरी मोहिम राबविली त्यास कर्जतकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती,याप्रसंगी कर्जत विकास संघर्ष समितीचे ॲड. कैलास मोरे, राजाभाऊ कोठारी, कृष्णा जाधव, विनोद पांडे, जयवंत म्हसे, प्रभाकर गंगावणे, शिवसेवक गुप्ता, अजय वर्धावे, मन्सुर बोहरी, मुकेश पाटील, अरविंद मोरे, मल्हारी माने, प्रशांत उगले, धनंजय दुर्गे, अमिर मनियार, निलेश हरिश्चंद्रे, सुमेश शेट्टये, किशोर तावरे आदी उपस्थित होते.

शहरातील वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना, पादचाऱ्यांना तसेच रेल्वे प्रवाशांना शहरातील रस्त्यांवरून फिरण्यासाठी होणा-या त्रासाची, संतापाची तीव्रता पाहुन कर्जत विकास संघर्ष समितीने कर्जत शहरामधील रस्त्यांवर मोकळा श्वास कधी घेणार ? ही मोहीम राबविल्याने जेष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन आपल्या मनातील प्रशासना विरोधातील खदखद व्यक्त केल्याने शहरात चर्चेला उधाण आले. स्वाक्षरी मोहीम फलकावर अल्पावधीतच शेकडो स्वाक्ष-या झाल्याने शहरातील नागरिकांच्या मनातील तीव्रता दिसुन आली. सदर स्वाक्षरी मोहीमेस महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनी भेट देऊन स्वाक्ष-या केल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.