Press "Enter" to skip to content

सरपंच माधुरी पाटील आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत सरपंच सम्राट पुरस्कार वितरण कार्यक्रम आज अलिबाग येथे संपन्न झाला. यावेळी पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांना रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आणि विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्याहस्ते दैनिक नवराष्ट्र सरपंच सम्राट पुरस्कार २०२२ अंतर्गत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांनी ग्रामपंचायतमध्ये विविध आदर्शवत विकासकामे करत गावांचा विकास साधला आहे त्यांनी गावांमध्ये विकासकामे करण्यावर भर दिला आहे.

त्याचबरोबर कोरोना काळात जनजागृती, अन्न धान्य वाटप, लसीकरण मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जलमिशन अंतर्गत योजना राबविण्यात येत आहे, तसेच विविध विकासकामे करून त्यांनी आदर्श काम केले आहे, त्यामुळे त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.