एका शेतकऱ्याने केली गांजाची शेती : गुन्हे शाखेने केली गांजाची ४०५ झाडे जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अकोला पोलीस उपनिरीक्षक संतोष महल्ले यांच्या टीम ची कारवाई
सिटी बेल • अकोला • डॉ संजय चव्हाण •
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुका पाटखेड येथे राहणाऱ्या सचिन रमेश महाजन या शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजाची शेती केली आहे. या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेचे मोठी कारवाई करीत शेतातील गांजाची ४०५ झाडे असा एकुण ६२ किलो ८.५० ग्रॅम माल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंदा देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी सहकारी पोलीस व पंचांसह पाटखेड येथे शेतामध्ये जाऊन छापा टाकला. या कारवाई दरम्यान आरोपी सचिन महाजन (वय ४०) राहणार पाटखेड यांच्या शेतामधून एकूण ४०५ झाडे जप्त करण्यात आली. एकूण ६२ किलो ८५० ग्रॅम गांजाची झाडाची एकूण किंमत ०१,१८,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध आप क 157/2022 कलम 20 (अ )( ब ) एन डी पी एस नुसार बार्शीटाकळी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई श्री जी श्रीधर (पोलीस अधिक्षक अकोला), श्रीमती मोनिका राऊत (अप्पर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील महल्ले, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, एस आय ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल, गणेश पांडे, दत्तात्रय ढोरे, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रवी पालीवाल, श्रीकांत पाचोड, संदीप टाले, अनिता टेकाम, चालक अक्षय बोबडे यांनी केली आहे.
Be First to Comment