दिपक फर्टीलायझर कंपनी संचलित ईशान्य फाउंडेशन पाले खुर्द यांच्या माध्यमातून व्यवसाय साहित्य, मुलांना खेळणी वाटप
सिटी बेल • तळोजा •
भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हा अध्यक्ष,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने भाजपचे ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर व चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कमला देशेकर यांच्या मदतीने दिपक फर्टिलासर अँड पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड संचलित ईशान्य फाउंडेशन पाले खुर्द आयोजित “महिला आरोग्य जागृती कार्यक्रम” आणि “कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यवसाय साहित्य वाटप” कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसायाचे वाटप व रायगड जिल्हा परिषद चिंध्रण शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ कमलताई एकनाथ देशेकर – सरपंच चिंध्रण, सौ जयश्री काटकर – ए व्ही पी दिपक फर्टीलायझर कंपनी, संदीप काकडे – सी एस आर मॅनेजर दिपक फर्टीलायझर कंपनी हे उपस्थित होते.
यावेळी योगा प्रशिक्षक डॉ. रीचा भार्गव यांनी महिलांच्या आरोग्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे त्याचे महत्त्व सांगून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सर्व महिलांना करून आपल्या दैनंदिन कामात योगा करून आपलं आरोग्य निरोगी व सशक्त ठेवण्यासाठी योगाचा उपयोग आपण करू शकतो हे सांगीतले.

तसेच अमिता नील, डायरेक्ट ज्योती कलश संस्था, बेलापूर यांनी महिलांच्या आरोग्या संबंधित सॅनिटरी पॅड चा उपयोग व वापर कशा पद्धतीने करायचा आणि कोणत्या प्रकारचे पॅड वापरावे या संबंधित मार्गदर्शन आणि पॅड मुळे होणारे फायदे तोटे आणि पेड डिस्पोजल करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सौ जयश्री काटकर यांनी योगाचे आपल्या दैनंदिन जीवनात आणि सेंटर पॅडचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींवर महिलांसोबत चर्चा केली.

सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत पिठाची गिरणी, पेंटिंग साठी कॉम्प्रेसर आणि इलेक्ट्रिशन साहित्य संच चिंध्रण व पाले खुर्द येथील लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महोदर कुत्तरपाडा चिंचवली महाळुंगी चिंध्रण, पाले खुर्द येथील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशान्य फाउंडेशन मार्फत योगेश पाटील यांनी केले.








Be First to Comment