Press "Enter" to skip to content

परवानगी न घेता बैलगाडी शर्यत

बैलगाडीची ठोकर लागल्याने एकाचा मृत्यू , अनेक नियमांचे उल्लंघन : नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत तालुक्यातील मौजे उक्रूळ येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यती आयोजकांनी रायगड जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता आयोजित केलेल्या बैलगाड्या शर्यत त्यांना चांगलीच महागात पडली आहे यामध्ये एकाच मृत्यू झाल्याने बैलगाडी शर्यत आयोजकांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तालुक्यातील मौजे उक्रूळ येथे दि. 18 मार्च 2022 रोजी सकाळी 10:30 ते 3:00 वा च्या सुमारास बैलगाडी शर्यत आयोजकांनी बैलगाडी शर्यत करीता लागणारी मा.जिल्हाधिकारी यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून घटनेच्या ठिकाणी शेकडो प्रेक्षकांचा बेकायदेशीर जमाव जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

सहभागी होण्यासाठी आजचं काॅल करा

तसेच आयोजकांनी कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये या करीता कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे शर्यतीच्या ठिकाणी बैलगाडी शर्यत बघण्यासाठी उपस्थित असलेले दौलत बाजीराव देशमुख (वय 66 वर्षे) रा.चोचीची वाडी कर्जत यांना बैलगाडी शर्यती चालू असताना अज्ञात आरोपीच्या बैलगाडीची ठोकर लागल्याने ते जागीच मृत्युमुखी झाले.

या बाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं.81/2022 भा.द.वि कलम 304 अ,279,337, 338, 188, 269, 270, 271, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) चे उलंघन 135 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 5,1, प्राण्यांना क्रूरतेने वागणूक प्रतिबंध कायदा 1960 चे कलम 11(1),(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक तेंडूलकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.