Press "Enter" to skip to content

हलगर्जीपणामुळे ड्रायव्हरला गमवावा लागला जीव

हायवेवरून टँकर २० फूट खाली कोसळला

सिटी बेल • पनवेल • संजय कदम •

पुण्याहून मुंबईला निघालेल्या केमिकल भरलेला टँकर एक्सप्रेस हायवेवरील पनवेलजवळील नेवाळी ब्रिजजवळ आला असता चालकाच्या हलगर्जीपणामुळे रस्तासोडून २० फूट खाली कोसळल्याने टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अरविंद यादव याला आपला जीव गमवावा लागला आहे.

या अपघातात टँकरची पुढील चाके निखळली असून बाजूला फेकली गेली आहेत. यावरून या अपघाताची भीषणता दिसून येते. चालक अरविंद यादव वय ४२ हा हाजीमलंग रोड कल्याण येथील रहिवासी आहे. सदर अपघाताबाबत खांदेश्वर पोलीस ठाणे पनवेल येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.