Press "Enter" to skip to content

आदिवासी वाड्याना रस्ता द्या

वळवली गावाला सुविधा द्या, वळवली ग्रामस्थांची आयुक्तांकडे मागणी

सिटी बेल • कळंबोली • विकास पाटील •

पनवेल महानगरपालिका हद्दतील सिडको प्रकल्पग्रस्त क्षेत्रातील वळवली गावाला अनेक समस्याने वेढले आहे. या गावाला सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी करत पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना वळवली ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले.

पनवेल महानगर पालिकेत वळवलीसह अन्य गावचा समावेश करण्यात आल्या पासून या गावातील सुविधांचा बोजवारा झाला आहे. पालिकेत समाविष्ट केलेल्या वळवली व इतर गावातील गुरचरण गावठाण विस्तारासाठी राखून ठेवून ग्रामस्थाना घरे बांधण्यासाठी परवानगी देवून त्यांना घरपट्टी देण्यात यावी . सिडकोने प्रकल्पग्रस्थ शेतक-यांच्या वारसांना सिडको तर्फे कायम करण्याचे आश्वासन दिले होते . परंतू ते आजतगायत पूर्ण झाले नाही. तरी महानगरपालिकेत येणा-या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधा-या प्रथमतः देण्यात यावे . ( कायमस्वरूपी किंवा ठेकेदार पध्दत ), सिडको प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या वारसांना रोजगार करण्यासाठी फुटपाथवर कायमस्वरूपी महानगरपालिके तर्फे जागा देण्यात यावी, प्रकल्पग्रस्त वळवली गावात गटाराची सुविधा नाही ती तातडीने करण्यात यावी . प्रकल्पग्रस्त वळवली गावात दत्त मंदिर ते कळंबोली रेल्वे स्टेशन हा रहदारीचा रस्ता कॉक्रींटीकरण करून करण्यात यावा . पनवेल महानपालिकेच्या माध्यमातून उपआरोग्यकेंद्र चालू करण्यात यावे . जेणेकरून नागरीकांना प्राथमिक सुविधा ताबडतोब जागेवर उपलब्ध होतील . गावातील विद्युत वाहिन्या भुमिगत करण्यात याव्यात .

वृक्ष लागवडीवर शासन मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्याचे रक्षण करणेही तितकेच महत्वाचे आहे. तेव्हा वळवली गावाजवळ ग्रामपंचायतीकडून लावलेल्या वनराईच्या झाडांना कुंपन तार घालून झाडांची निगा राखण्यात यावी. सिडको हद्दीतील प्रकल्पग्रस्त गावामध्ये मुख्य ठिकाणी सि.सि.टी. व्ही कॅमेरे बसवून गावे मुख्य प्रवाहात आणावीत . जेणे करून नागरिकांना सुरक्षा मिळेल., वळवली व टेंभोडे येथील सागवाडी व वाघ-याची वाडी या आदिवासी बांधवाना जाणे – येणेसाठी रस्ता नसल्याने नागरिकांना मोठी अडचण होत आहे रात्रीच्या वेळी तर अपघाताला होत आहेत. तर महिलाना रात्रीचा प्रवास करणे जीवावर बेतने होत आहे. तेव्हा रस्त्याची सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी .

नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर उपाय योजना करावी अशी मागणी शिवराज प्रकल्पगस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख श्री विश्वास पेटकर यांनी महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे यावेळी
श्री दिलीप पाटील(मा.सरपंच,)श्री मारुती पाटील(पुरातन शिवमंदिर अध्यक्ष)श्री मारुती पालेकर (उपाध्यक्ष)श्री उमेश पेटकर, श्री संदीप पाटील, कु आकाश पेटकर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.