शेकापच्या गजानन पाटील यांचा
असंख्य समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
सिटी बेल • पनवेल • प्रतिनिधी •
पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी उपसरपंच गजानन तुळशीराम पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकार्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, पं. स. सदस्य रेखा म्हात्रे, माजी सदस्य सुभाषशेठ म्हात्रे, सुजाता जितेकर, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, पाटणोलीचे माजी सरपंच प्रकाश पाटील, दापोलीचे माजी सरपंच गोवर्धन डाऊर, पारगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य कल्पना तारेकर, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड, सुनीलशेठ म्हात्रे, विहान जितेकर, समीर केणी, मंगेश शेलार आदी उपस्थित होते.

या वेळी शेकापचे गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी राजकुमार जितेकर, राहुल पाटील, दशरथ पाटील, जितेंद्र जितेकर, भरत कुडावकर, चिंतामण घोपरकर, मनीषा पाटील, सोनाली पाटील, धनश्री पाटील, सुषमा जितेकर, अरुणा जितेकर आदी असंख्य समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.








Be First to Comment