Press "Enter" to skip to content

भारनियमन रद्द करण्यास पाडले भाग

शिवसेनेमुळे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा !!

सिटी बेल • पनवेल • संजय कदम •

शिवसेनेमुळे आज दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरातील अमरधाम स्मशानभूमी ते ओल्ड पोस्ट ऑफिस या पूर्ण भागात शट डाऊन /भारनियमन करण्यासंबंधीचे मेसेज नागरिकांना काल रात्री उशिरा प्राप्त झाले होते. आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून पहिला पेपर आहे व परीक्षेचे सेंटर देखील या पट्ट्यात मोडते, तथापि विद्यार्थ्यांचा सुरू असलेला अभ्यास, प्रचंड उकाडा या सर्वांमुळे आजच्या दिवशी हे भारनियमन होऊ नये अश्या तक्रारी शिवसेना महानगर संघटक, मा. नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या कडे काही नागरिकांनी व्हाट्सअप वर द्वारे केल्या होत्या.

सदर बाबतीत सकाळी ताबडतोब महावितरणकडे याबाबत सोमण यांनी चर्चा केली असता महानगरपालिकेच्या एका कामामुळे लाईन बंद करणार आहोत असे सांगितले. त्यावेळी महानगरपालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व महावितरणचे अधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क आणि पाठपुरावा घेऊन आज सकाळी नऊ वाजल्यापासून होणारे भारनियमन त्यांनी रद्द करण्यास भाग पाडले.

चुकीच्या वेळी अशा पद्धतीने काम सुरू करून विद्यार्थी व नागरिकांना त्रास झाल्यास प्रत्यक्ष जागेवर येऊनच काम बंद करू असा इशारा सोमण यांनी दिला. अखेरीस महापालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करत आजचे भारनियमन करणार नसल्याबाबतची खात्री शिवसेनेला दिल्याने पालक वर्गाने आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.