Press "Enter" to skip to content

पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सत्कार

सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ

सिटी बेल • कळंबोली • मनोज पाटील •

सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल येथे लोकसभा खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्पर्धांचे व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला .

शिक्षणमहर्षी स्व. दादासाहेब लिमये यांच्या जयंती निमित्त कोकण विभागीय कनिष्ठ महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होते .या स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र तसेच २०२०-२१ या वर्षांत संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी मिळविलेल्या पुरस्काराबद्दल आणि सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली च्या कार्याध्यक्षा गीताताई पालरेचा यांची पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा निवड झाल्या बद्दल खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले .

या वेळी राष्ट्रवादी काॅग्रेस प्रदेश सरचिटणिस प्रशांत पाटील ,राष्ट्रवादी काॅग्रेस महिला प्रदेश सरचिटणिस भावनाताई घाणेकर ,सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा गीताताई पालरेचा ,सचिव रवीकांत घोसाळकर , सस्थेचे प्रशासकीय प्रमुख मिलिंद जोशी ,पनवेल महापालिका नगरसेवक सतिश पाटील,विजय खानावकर ,रायगड जिल्हापरिषद माजी सदस्य वैजनाथ ठाकूर ,राजेंद्र पाटील ,प्राचार्य राजेंद्र पालवे ,माधव पाटील ,सुदाम पाटील आदि मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रच्या सुरवातीला कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी सदिच्छा भेट देवून शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल ठाकूर ,मंदाकिनी देशमुख व कौशल्या मौमिनगीरे यांनी केले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.