Press "Enter" to skip to content

होळी नंतर पदग्रहण सोहळा

हिंद मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्षपदी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण यांची निवड

सिटी बेल • पनवेल •

हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस ॲड किशोर बांदल देशमुख यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे यांनी निवृत्त एसीपी विनोदराव बाबुराव चव्हाण यांची हिंद मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्षपदी निवड जाहीर केली.

या वेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले यांनी सांगितले, गेली अनेक वर्षे त्यांनी कोकण प्रदेश येथे सेवा काल पूर्ण केला त्यांच्या सुस्वभावी गुणामुळे त्यांनी अनेकांना आपले से केले. समाज बांधव मोठ्या प्रमाणात आपला माणूस म्हणुन अधिकारवाणीने संपर्क साधून अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शन केले. समाजाची सेवा करत असताना संपूर्ण कोकणला आपलेसे वाटू लागले. निवृत्ती नंतरचे आपले आयुष्य समाज ऋणातून उतराई होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच हिंद मराठा महासंघ ध्येय धोरणानुसार काम करावयाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लाखो समाज बांधव देशभरातून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करत अभिनंदन करत आहेत. पनवेल येथे होळी नंतर त्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच या वेळी बोलताना भोसले यांनी सांगितले.

राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश शेडगे, राष्ट्रिय सल्लागार हेमंत बाबुराव शिंदे, राष्ट्रीय सल्लागार किशोर केसरकर, रोजगार उद्योग विभाग राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष राजेंद्र आंब्रे, राज्य कार्याध्यक्ष सुधीर पालांडे, राज्य उपाध्यक्ष महेश पालांडे, कोकण प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते संजय रेवने, गुजरात राज्य अध्यक्ष देवेश माने, बडोदे जिल्हा अध्यक्ष प्रदीप मोरे, सुरत जिल्हा अध्यक्ष संतोष मालुसरे, शहर अध्यक्ष राजु शेवाळे, बळसाड जिल्हा अध्यक्ष योगेश भोसले, वापी शहर अध्यक्ष अमेय पालांडे, बैतूल जिल्हा अध्यक्ष योगेश्वर राव गायकवाड, इंदोरचे नेते मल्हारराव कदम, हिमाचल प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत वाघ, कर्नाटक प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर खाडे, हरियाणा राज्य अध्यक्ष राम नारायण मराठा, पालघर जिल्हा अध्यक्ष संतोष सावंत, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णा साळवी, चित्रपट रंगभूमी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शिमगा चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक निलेश पालांडे, हिंद मराठा महासंघ महीला अध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले, राज्यसरचिटणीस व प्रवक्ते श्रीकांत चाळके, मुंबई प्रदेश महीला अध्यक्षा भक्ती भार्गव भोसले, रत्नागिरी उतर जिल्हा अध्यक्षा सौ सायली संतोष भोसले, जिल्हा उप अध्यक्ष विजय येरुंकर, सरचिटणीस जयवंत पालांडे, डॉक्टर शिवदास भोसले, खेड तालुका प्रमुख राजेंद्र घाग, ॲड आनंदराव भोसले, पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णा साळवी, वसई विरार महानगर पालिका अध्यक्ष जितेन्द्र पालांडे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती सुनिता दत्ताराम चव्हाण, रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष विनायक खानविलकर, महीला अध्यक्षा सौ अमृता अरविंद नलावडे, रत्नागिरी जिल्हा संघटक अशोक पालांडे आदी मान्यवरांसह सह देशभरातून मराठा बांधव अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.