धामोते – नेरळ येथे कातकरी उत्थान अभियान कार्यक्रमाचे अयोजन
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे प्रेरणेतून कातकरी उत्थान अभियानांतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील धामोते-नेरळ येथील आगरी समाज हॉल येथे आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, कोव्हिड लसीकरण, आधारकार्ड नोंदणी शिबीर ठेवण्यात आले होते व आदिवासी मेळाव्यात 700 जातीचे दाखले, 50 रेशनकार्ड , 20 उत्पन्नाचे दाखले तयार करण्यात आले प्रातिनीधीक स्वरुपात काही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आदिवासी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले व श्रमिक क्रांती संघटने सुरेखा दळवी यांनी आदिवासीचे आरोग्य व बालविवाह रोखणे तसेच स्थालांतर रोखणे व रोजगार निर्मिती या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाप्रसंगी कर्जत उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) अजित नैराळे, कर्जत तहसिलदार विक्रम देशमुख,श्रमिक क्रांती संघटना प्रमुख सुरेखा दळवी, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नायब तहसीलदार बुरसे, वैद्यकीय अधिकारी पवार, मंडळ अधिकारी नेरळ संतोष जांभळे, अरूण विशे, तलाठी, कोतवाल यांचे सह कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपविभाग अधिकारी अजित नैराळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आदिवासी विकासासाठी सप्तसूत्री निश्चित करण्यात आली आहे या बाबत कालबध्द कार्यक्रम आखुन त्यांचे योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सतत कार्यरत राहू असे सांगितले.








Be First to Comment