Press "Enter" to skip to content

समस्या व त्यावर उपाययोजना यावर चर्चा

उरण शहराच्या नागरी सुविधा बाबत शेकापच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण शहरात भेडसावणाऱ्या नागरी सुविधा बाबत शेकापच्या वतीने उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विविध समस्या व त्यावर उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

उरण शहरात जानेवारी महिन्यापासून मंगळवार व शुक्रवारी पाणी पुरवठा बंद करण्यात आला यामुळे शहर वासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी रानसाई धारणा व्यतिरिक्त हेटवणे किंवा मोरबे धरणाचा अतिरिक्त पाणी साठा घेऊन उरणकारांची तहान भागवावी. शहरातील वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत आहे आनंदनगर ते राजपाल नाका कोटनाका या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

रस्ते मोकळे होण्यासाठी सुनिश्चित धोरण आखावे.कोटनाका ते कोर्टापर्यंत बायपास रस्ता यामधील अडचणी दूर करून हा रस्ता तयार झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शहरात होत असलेली अनधिकृत बांधकामे यांचेवर कारवाई करावी. शहरातील धुळीवाडा येथे नवीन पाण्याची लाईन टाकावी. शहरातील पाण्याचे होणारे लिकेज काढाव्यात.तसेच शहरात कीटकनाशक फवारणी करावी.

शहराची पावसाळ्या आगोदर नालेसफाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी संतोष माळी या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच उरण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना शेकाप शिष्ट मंडळ भेटणार आहेत.

मुख्याधिकारी संतोष माळी यांना निवेदन देताना शहर चिटणीस शेखर पाटील, तालुका सहचिटनिस यशवंत ठाकूर, शहर अध्यक्षा नयना पाटील, शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, शहर सहचिटनिस चिंतामण गायकवाड, शहर पदाधिकारी शंकर भोईर, होमगार्ड अध्यक्ष नारायण पाटील, दिलीप पाटील कोंडस्कर, किशोर घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.