दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या दोन बलिकां झाल्या एकदिवसीय पोलीस अधीक्षका
सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी अलिबाग येथील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या देवश्री निगडे व सिमरन घतानी ह्या दोन बलिकांना एक दिवसीय पोलीस अधीक्षक पदाची पोलीस पदाची सूत्रे हाती देत रायगड जिल्हयात नवीन उपक्रम राबविला असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गंभिर आजाराने त्रस्त असलेल्या देवश्री निगडे व अपघातात जायबंदी झालेल्या सिमरन घतानी या दोघींना एक दिवसाकरिता सोपवून त्यांच्या जिवनात त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तसेच त्यांची प्रेरणा ही इतरांनी घ्यावी यासाठी एक छोटा उपक्रमराबविण्याचा प्रयत्न केला प्रयत्न जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी केला.

पोलिस अधिक्षक दैनंदिन काम करतात त्या पद्धतीने या दोघी आज आपले कर्तव्य निभावित होत्या. त्यांनी नियंत्रण कक्षात फोन करून दिवस भरातील घटना जाणून घेतल्या.
आपल्याला काहीतरी झालय म्हणून तेच धरून न राहाणार्या व समाजापासून उपेक्षित राहीलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांचा महिला दिनी मान-सन्मान करावा म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी शोधकार्य सुरु केले होते. त्यांनतर अधिक माहीती घेतली असता पोलिस विभागातील मंगेश निगडे या कर्मचार्याची मुलगी दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचे कळाले, तर सिमरनचा स्कुलमध्ये जाताना अपघात झाल्याने तिला वॉकर शक्य चालता येत नसल्याची माहीती अशोक दुधे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ या मुलींच्या पालकांसमवेत चर्चा करून त्यांना एक दिवसाच्या पोलिस अधिक्षक बसविण्याचा मान दिला.

देवश्री निगडे व सिमरन घतानी या दोघीचें ठिक चार वाजता सरकारी लाल दिव्याच्या वाहनातून जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आगमन झाले. त्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यालयात येताचा जिल्हा पोलिस अधिक्षक असोक दुधे, अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी देवश्री व सिमरनचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सिमरने सुत्रे हातामध्ये घेतल्यानंतर सर्वप्रथम नियंत्रण कक्षाला संपर्क साधून दिवसभरातील जिल्ह्याच्या परीस्थितीचा आढावा घेतला. कुठे बंदोबस्त तर लागला नाही ना, अपघात वा छेडछाड तर झाली नाही ना असे अनेक प्रश्न कर्तव्यास असलेल्या अधिकार्यांना विचारले. तर देवश्रीने भविष्यात आपण पोलिस अधिकारी बनुन महीलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.देवश्री हिचे वडील हे पोलीस खात्यात असून ते डॉग स्कॉड या पथकात कार्यरत आहेत.कडक शिस्तीचे वातावरण असणार्या पोलिस अधिक्षक कार्यालयात या निमित्ताने एक आनंददायी वातावरण अनुभवायस मिळाले.

मोठ्या अपघातातून वाचलेल्या तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मुलींना जीवनामध्ये उमेद मिळून त्यांचे मनोधैर्य आणि स्पर्धा परीक्षांना बसलेल्या मुलांना त्यांच्याकडे पाहून प्रेरणा मिळून तरुण मुले भविष्यात अधिकारी झाली तर आमचा उद्देश साध्य होईल.
अशोक दुधे, जिल्हा पोलिस अधिक्षक
आमच्या मुलीचा आत्मविश्वा खचू नये म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्नात असायचो. तिला नॉर्मल व्यक्तीसारखच नेहमी वागत आहोत. मात्र पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी आमच्या मुलीला एक दिवसाच्या पोलिस अधिक्षकांच्या खुर्चीवर बसवून अधिक्षक बनण्याचा मान दिल्याने तिच्या आत्मविश्वासात अधिक प्रभाव पडला आहे. सरांनी वाढविलेल्या आत्मविश्वासामुले आमची मलगी अधिकारी बननार हे नक्की.
अनिता निगडे, पालक








Be First to Comment