नवीन पनवेल गुरुद्वाराचे संस्थापक हरचंद सिंग संगु रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित
सिटी बेल • अलीबाग •
नवीन पनवेल गुरुद्वाराचे संस्थापक हरचंद सिंग संगु यांना रायगड भूषण पुरस्कार-२०२२ ने सन्मानित करण्यात आले.
या मागे त्यांनी केलेल्या सार्वजनिक उपक्रम व लोकांसाठी केलेली समाजसेवा आहे. त्यांनी सार्वजनिक उपक्रमामधे सहभागी होऊन तसेच कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडर चा तसेच गरजु लोकांना अन्य धान्य पुरवठा शिख समुदया मार्फत करून पिडीत लोकांना जे मदत कार्य केले व कोंकण पूरग्रस्तांना जीवन्नस्त वस्तूचा पुरवठा करून जे अविस्मरणीय समाजकार्य केले आहे याची नोंद घेऊन रायगड जिल्हा परिषदच्या वतीने रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पनवेल मनसे तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.








Be First to Comment