Press "Enter" to skip to content

विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्यांचा गौरव

वास्तू अंगण सोसायटीमध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमाने साजरा

सिटी बेल • कळंबोली • प्रतिनीधी •

जागतिक महिला दिनानिमित्त कळंबोली वास्तू अंगण सोसायटीमध्ये महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना मोगऱ्याचे झाड व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

भारत सरकारच्या सीए ( चार्टर अकाऊटंट ) या परीक्षेत उज्ज्वळ यश मिळविलेल्या कुमारी चैत्राली भास्कर कोपरकर हिचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या महामारीने होतं ते नव्हतं केले आहे. असा परिस्थितीत उभारी देत, त्यांच्या मनात जागतिक महिला दिना निमित्त वास्तू अंगण सोसायटीमध्ये महिलांचा हळदी कुंकू, संगीत खुर्ची, बजेट बॉल, गाणे असा अनेक खेळ खेळण्यात आले. यात सोसायटी मधील सर्व महिलांनी आवर्जून भाग घेतला होता.

हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
सौ सुरेखा वाघमारे, सौ गायत्री पाटील, सौ वनिता पाटील, सौ रुपाली मोरे, सौ प्रियांका वाडेकर, सौ मोनिका फुटाणे यांनी खूप मेहनत घेत आपल्या सोसायटीमध्ये प्रेमाचे व एकोपाचे सदैव वातावरण राहावे म्हणून असे कार्यक्रम होण्याची गरज असूनते करण्यात आम्ही महिला प्रयत्न करू असे सौ गायत्री पाटील, सौ सुरेखा वाघमारे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.