मराठा महासंघ चित्रपट व रंगभूमी विभाग राष्ट्रीय अध्यक्षपदी निलेश पालांडे
सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •
हिंद मराठा महासंघ चित्रपट व रंगभूमी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष पदी शिमगा चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक निलेश पालांडे यांची निवड जाहिर करण्यात आली आहे.
राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे यांनी जाहीर केली आहे.
निलेश कृष्णाजीराव पालांडे हे कोकणातील खेड तालुक्यातील तळवट पालं येथील रहिवाशी आहेत.
आपल्या श्री केळमाई भवानी प्रोडक्शन द्वारा कोकणातील जिवाभावाचा सण असलेल्या शिमगा या चित्रपटद्वारे त्यांनी ग्रामीण जीवन उलगडून दाखवले आहे.आतापर्यंत त्यांनी आरंभ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चा उत्कृष्ट नायक पुरस्कार पटकावला आहे. तर अंबरनाथ फिल्म फेस्टिवल चा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार याशिवाय थर्ड आय आशियाई फिल्म फेस्टिवल चा बहुमान देखील मिळवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








Be First to Comment