Press "Enter" to skip to content

तहसीलदार विजय तळेकर यांच्या हस्ते वाटप

9 लाभार्थ्यांना 1 लाख 80 हजाराचे धनादेश

सिटी बेल • पनवेल • संजय कदम •

तहसिलदार कार्यालय पनवेल, येथे या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य योजना, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत योजनांबाबत एकनाथ विष्णू नाईक, (नायब तहसिलदार, संजय गांधी योजना), यांनी योजनांची माहीती देऊन कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

पनवेल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनांचे अध्यक्ष तथा तहसिलदार पनवेल, तसेच या समितीचे शासकिय सदस्य, गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल, यांच्या झालेल्या समितीच्या बैठकीत, मंजूर झालेल्या संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा, वृध्दापकाळ योजनेच्या पात्र 53 पात्र लाभार्थ्यांना एकुण 55 हजार 600 रूपये  रक्क्मेची मंजूरी दिलेली असून उपस्थित विधवा व अपंग महिला 25 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच केंद्र शासनाचे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 18 ते 59 वर्षे वयाच्या कुटुंबातील कर्ता पुरूष मयत झाल्यास त्याचे कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ दिला जातो.

सदर योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 9 लाभार्थ्यांना प्रतिलाभार्थी रक्कम रूपये 20 हजार याप्रमाणे एकूण रक्कम रूपये 1 लाख 80 हजाराचे धनादेश विजय तळेकर, तहसीलदार पनवेल यांचे हस्ते वितरीत करण्यात आले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.