सिटी बेल • अलीबाग •
रायफल शूटिंग या क्रिडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या कु. रुजुता महादेव बुकम हीला रायगड जिल्हा परिषद-अलिबाग तर्फे देण्यात येणारा रायगड भूषण पुरस्कार-२०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.
रुजुता बुकम ही लक्ष्य शूटिंग क्लब ,कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी पनवेल ची मेंबर व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया ची शूटर आहे. तिला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तिचे आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशीनाथ पाटील, माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे आदींनी अभिनंदन केले आहे.








Be First to Comment