Press "Enter" to skip to content

कामोठे येथे महिला दिन साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहर ( लिगल सेल ) मार्फत महिला दिनानमित्त मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रम

सिटी बेल • कामोठे •

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ( लिगल सेल ) कामोठे शहर यांच्या तर्फे महिला दिनानिमित्त सर्व सामन्यांसाठी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कामोठे येथील सेक्टर ३६, आईमाता मंदिर परिसरात करण्यात आले होते.

या वेळी शहरातील नागरिकांनी त्यांच्या कायदेशीर समस्या आमच्या लिगल सेलच्या तज्ञ वकिलांशी चर्चा करून त्याची इत्थंभूत माहिती मिळवली व त्यांच्या समस्येवर अगदी फायदेशीर अशी माहिती प्राप्त करून समस्येचे निवारण झाल्यामूळे त्यांनी सर्व आयोजकांचे आभार देखील मानले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कामोठे शहरांच्या वतीने असेच लोकाभिमुख कार्यक्रम नेहमीच राबविले जातील अशी ग्वाही देखील कामोठे शहरांचे कार्याध्यक्ष किशोर मुंढे यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे आयोजक लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. पवनकुमार गायकवाड, शहर कार्याध्यक्ष किशोर वसंत मुंढे, शहर अध्यक्षा सौ. संगीत पवार तसेच कार्यक्रमा प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष बबनराव पवार, जिल्हा सरचिटणीस सौ. जयश्री देसाई, शहर उपाध्यक्षा सौ. संध्या गायकवाड, अॅड. सौ. वैशाली पाटील व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.