Press "Enter" to skip to content

आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

कमल हेल्थकेअर व समर्थ फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणागिरी नोड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

कमल हेल्थकेअर व समर्थ फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.अविनाश गोरड(B.H.M.S) यांनी द्रोणागिरी नोड उरण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत नागरिकांचे मोफत रक्तगट तपासणी, साखर तपासणी, ऑक्सिजन तपासणी, उच्चरक्तदाब तपासणी, शरीराची तापमान तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराचा नागरिकांनी, गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर यांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी द्रोणागिरी शहर शिवसेना शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.