शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर “वसई- विरार- आलीबाग काॅरीडोर प्रकल्पग्रस्थ संघर्ष समिती” च्या आध्यक्षपदी
सिटी बेल • उरण • सुभाष कडू •
उरण तालुक्यातील 16 गावांमधून शासनाचा बहुउद्देशीय वसई- विरार- आलीबाग काॅरीडोर जात आहे.त्या काॅरीडोरला जमिनी जाणार्या 16 गावांमधील शेतकर्यांनी आपल्या न्यायहक्कांसाठी दादरपाडा येथील बैठकीमध्ये “वसई- विरार- आलीबाग काॅरीडोर बाधीत शेतकरी संघर्ष समिती”ची स्थापना केली. या समितीच्या आध्यक्षपदी शिवसेना उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांची तर सचिवपदी रविंद्र कासूकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
या समिती मध्ये प्रत्येक गावाला प्रतीनीधीत्व देण्यात आले आसून एकूण 25 जणांची जंबो कमिटी निवडण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्ष, खजिनदार, सल्लागार अशी पदे निवडण्यात आली आसून प्रत्येक गावाला एक पद देण्यात आले आहे. त्याचबरोबर विशेष सल्लागारां मध्ये वकील, समाज सेवक व पत्रकार यांचे देखील मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या जंबो कमिटीच्या माध्यमातून वसई- विरार- आलीबाग काॅरीडोर बाधीत उरण मधील शेतकर्यांना योग्य मोबदला व शासनाच्या सोई सुविधा मिळवीण्या संबंधी प्रयत्न करण्यात येणार आसून वेळ प्रसंगी कायदेशीर लढा ही उभारण्यात येणार आहे.
उरणचे माजी आमदार मनोहर भोईर यांचे निकटवर्ती असणारे,व संघर्ष करून शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष पदापर्यंत धडक मारणारे संतोष ठाकूर यांची या समितीच्या आध्यक्षपदी निवड झाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.त्याच बरोबर संतोष ठाकूर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असणार्या पक्षाच्या तालुका प्रमुख असल्याने ते शेतकर्यांना न्याय मिळवून देतील अशा भावना शेतकर्यांनी व्यक्त केल्या आहेत.
वसई- विरार- आलीबाग काॅरीडोर बाधीत उरण मधील 16 गावांतील शेततकर्यांनी माझ्यावर विश्वास दाखवीला आहे त्या बद्दल प्रथम धन्यवाद.तसेच मि सुद्धा या काॅरीडोर मध्ये बाधीत होणारा शेतकरी आहे.त्यामूळे माझ्यावर दाखविलेला विश्वास मि सार्थकी लावून शेतकर्यांना न्याय मिळवून देईन.
संतोष ठाकूर – शिवसेना उरण तालुका प्रमुख








Be First to Comment