पनवेल तालुका तालुका सहकारी भातगिरणी चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची निवड
सिटी बेल • पनवेल •
कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मध्ये पनवेल तालुका तालुका सहकारी भातगिरणी चेअरमन पदी रवींद्र पाटील यांची निवड झाली तसेच शेतकरी कामगार पक्षाचे 11 सदस्य बिनविरोध निवडून आले. रवींद्र पाटील हे दुसऱ्यांदा चेअरमनपदी विराजमान झाले आहेत. याआधीही त्यांनी चेअरमन पदांची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

या सर्वाना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशिनाथ पाटील, शेकापक्षाचे जेष्ठ नेते माजी तालुका चिटणीस नारायणशेठ घरत, पमपा विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, एपीएमसी चे सभापती डॉ.दत्तात्रेय पाटील, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, मा.चेअरमन एम सी पाटील, मा.व्हाईस चेअरमन राजेंद्र घरत, नैना कमिटीचे अध्यक्ष व संचालक वामन शेळके, पनवेल अर्बन बँक संचालक माधुरी गोसावी, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, नगरसेवक प्रमोद भगत, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, पमपा सहचिटणीस देवेंद्र मढवी, युवा जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, एपीएमसी सचिव भरत पाटील, खारघर शहर चिटणीस अशोक मोरे, तळोजा शहर चिटणीस प्रताप पाटील, संचालक मंडळ मीरा विजय म्हात्रे, लिला मारुती भस्मा, गणेश गायकर, दिनकर मुंढे, दत्तात्रय मोरे, अनंता कांबळे, नारायण तुपे, गणेश कोळी, भातगिरणीचे सचिव संदीप केणी, कर्मचारी रुपेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment