Press "Enter" to skip to content

पंकज ओसवाल यांना अखेर यश

कर्जत रेल्वे स्थानकावर डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्याला सुरुवात

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविणात यावेत यासाठी रेल्वे प्रशासनाशी गेल्या दोन वर्षा पासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांना अखेर यश मिळाले आहे. कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्याची सुरुवात केली आहे.

कर्जत स्थानकात आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. कधी आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात गाडी चुकायची तर कधी समान फलाटवरच रहायचे तर काही वेळा डबा पकडण्याच्या नादात अपघातही झाले आहेत. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यात यावेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल गेल्या दोन वर्षा पासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते.

सुरुवातीला कर्जत रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्याची मागणी केली असता रेल्वे प्रशासना कडून, कर्जत रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्याच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स ची गरजच नाही. असे कळविले होते.

यावर ओसवाल यांनी कर्जत रेल्वे स्थनाकात एक्सप्रेस च्या डब्यांची स्थिती दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर्स ची का आवश्यकता आहे. हे पटवून दिले व पुन्हा विनंती केली असता रेल्वे प्रशासनाने याकरिता कोणी जाहिरातदार उपलब्ध होतो काय ? किंवा कुणी व्यावसायिक प्रसिद्धीसाठी उपलब्ध होतो काय ? हे पाहिल्यावर कर्जत रेल्वे स्थानकावर तसे इंडिकेटर्स बसविण्यात येईल. असे ओसवाल यांना कळविले होते.

या बाबतीत रेल्वे प्रशासना कडून काहीच कार्यवाही होत नसल्याने ओसवाल यांनी काही दिवसांनी पुन्हा पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासनाने ओसवाल याना फलाट क्रमांक एक ची लांबी वाढविल्या नंतर इंडिकेटर्स बसविण्यात येईल असे कळविले.फलाट क्रमांक एक चे लांबीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला पुन्हा विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाने कर्जत रेल्वे स्थानकात ज्या – ज्या सुविधा दिल्या पाहिजे होत्या त्या दिल्या आहेत असे सांगत कर्जत रेल्वे स्थानकावर इंडिकेटर्स ची आवश्यकता नाही असे रेल्वे प्रशासनाने म्हणायचे होते हे लक्षात आल्यावर ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाला ‘कर्जत रेल्वे स्थानकावर इंडिकेटर्स बसविले नाहीत आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिल्यानंतर रेल्वे प्रशासना कडून आर्थिक वर्ष 2021 – 22 मध्ये या कामाची मंजुरी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीय दिली होती. त्यानुसार कर्जत रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आले आहे व ते लवकरच पूर्ण होईल.

‘कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्याची सुरुवात करण्यात आली आहे व येत्या काही दिवसात पूर्ण होईल व कर्जतकरांची होणारी गैरसोय लवकरच दूर होणार आहे.
— पंकज मांगीलाल ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.