सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •
रोहा तालुक्यातील मेढा विभागातील
मुलभुत सुविधा अंतर्गत या भागात शासकीय योजनांद्वारे निधी प्राप्त करून अनेक विकासकामे करण्यात आली आहे.

यात मेढा येथे कोकण विकास अंतर्गत वाकेश्वर पुरातन मंदिर सुशोभीकरण
लोकार्पण सोहळा ,बस स्थानक तसेच भिसे उद्घाटन, भिसे डांबरीकरण रस्ता उद्घाटन, पोफळघर व्यायामशाळा उद्घाटन, भिसे व्यायामशाळा, ३०५४ अंतर्गत मौजे रेवोली रस्ता डांबरीकरण करण्यात आले.

यावेळी आमदार अनिकेत तटकरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, विजयराव मोरे, नंदकुमार म्हात्रे,माजी सभापती लक्ष्मण महाले, सरपंच सौ.स्नेहा खैरे, उपसरपंच उदय मोरे, विलास खांडेकर, भगवान गोवर्धने, मयूर खैरे,तालुका अध्यक्ष सौ.प्रितम पाटील, युवक अध्यक्ष जयवंत मुंढे, राजेंद्र पोकळे, अनंतराव देशमुख, संदीप चोरगे, प्रसाद देशमुख,तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी वृंद,ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ आदी उपस्थित होते.









Be First to Comment