न्यु बाँम्बे कंपनीवर निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने ग्रा.प.सदस्या तृप्ती पांचाळ उपोषणास बसणार
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
खालापूर तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायत हद्दीत असंख्य कारखाने असून आतील एक असणारी न्यू बाँम्बे कारखान्यातील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागरिक या कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करित असताना या कंपनीवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती महेश पांचाळ यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.
मात्र २ महिने उलटूनही कंपनीवर कारवाई न झाल्याने पुन्हा ग्रामपंचायत सदस्या तृप्ती पांचाळ या आक्रमक झाल्या असून कंपनीवर कारवाई होण्यासाठी तृप्ती पांचाळ २८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाला समोर उपोषणास बसणार आहेत, त्यामुळे तृप्ती पांचाळ विरुध्द कंपनी व्यवस्थापन संघर्ष अधिकच पेटणार यात तीळमात्र शंका नाही. तर उपोषणादरम्यान माझ्या जिवितास काय इजा झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असे मत पांचाळ यांनी व्यक्त केले आहे.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण जांभिवली ग्रामपंचायत हद्दीतील मधील न्यू बाँम्बे कंपनीच्या राखेमुळे संपूर्ण जांभिवली गावांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्व ग्रामस्थ या राखेमुळे चिंतेत सापडल्याचे पाहायला मिळत आहे, तर अलिकडच्या येथील काळात वाढत्या काही कारखानदारीमुळे व न्यू बाँम्बे कंपनीमधून निघणाऱ्या प्रदूषणावर कोणाचेही वचक न राहिल्यामुळे कंपनी प्रशासन आपल्या मर्जीप्रमाणे प्रदूषण करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत असल्याने कंपनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
न्यू बॉम्बे कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे जीवितास धोक्यात आले असून कंपनी मधून बाहेर पडणाऱ्या राखीमुळे जांभिवली गावातील नागरिकांसह आजूबाजूच्या परिसराचे आरोग्य धोक्यात आल्याने या कंपनीवर कारवाई होण्यासाठी २३ डिसेंबर २०२१ रोजी तहसीलदार कार्यालय व इतर प्रशासनाला निवेदन दिले होते, तर दोन महिने उलटून ही कंपनीवर कोणतीही कारवाई न झाल्याने २८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. तर उपोषणादरम्यान माझ्या जीवितास कोणतीही इजा झाल्यास त्यास सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील.
तृप्ती महेश पांचाळ (ग्रामपंचायत सदस्या – जांभिवली)
ग्रा.प.सदस्या तृप्ती पांचाळ यांच्या तक्रारीची माहिती तहसीलदार, वरिष्ठांना व प्रदूषण मंडळाला दिली असून त्यावर तहसीलदार, वरिष्ठ व प्रदूषण मंडळ यावर निर्णय घेतील.
बालाजी पुरी (गटविकास अधिकारी – खालापूर)








Be First to Comment