5 वर्षांपर्यंतच्या 1 लाख 82 हजार 289 बालकांना 2 हजार 525 बुथवर पोलिओ डोस देण्याचे आयोजन
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
रायगड जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेंतर्गत 5 वर्षांपर्यंतच्या 1 लाख 82 हजार 289 बालकांना 2 हजार 525 बुथवर पोलिओ डोस देण्याचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली होती.अनेक ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू असताना खालापूर तालुक्यातील लोहोप प्रथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी सीमा पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यीका महाडिक आणि आरोग्य सहाय्यक बडदडे यांच्या सह राबविण्यात आली या व्यतिरिक्त बस डेपो,रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी सुध्दा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमासाठी 5 हजार 647 आरोग्य कर्मचारी यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून,अंगणवाडी सेविका,आशा,शिक्षकांचा यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे.5 वर्षे पर्यंतच्या बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे.सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे,असे आवाहनही डॉ.किरण पाटील व डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.








Be First to Comment