Press "Enter" to skip to content

सुकन्या समृद्धी योजनेचे बुक वाटप

मुलींचे आशीर्वाद माझ्यासाठी बहुमूल्य आहे– सरपंच गोपीनाथ जाधव

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

भारतीय डाक विभाग सुकन्या समृद्धी योजनांतून मुलीचे भविष्य समृध्द होत असून, प्रत्येक पालक वर्गांनी आपल्या मुलीचे खाते खोलून तीच्या भाविष्यांसाठी तरतूद करून ठेवा.आपल्याला शक्य होईल असे पैसे जमा करीत जा, आज ५० खाते लहान मुलींचे माझ्या माध्यमातून होत असतांना मला मनस्वी आनंद होत आहे.कारण मुलीचे अशिर्वाद माझ्यासाठी बहुमुल्य आहे.असे मनोगत सरपंच गोपीनाथ जाधव यांनी व्यक्त केले.      

रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव येथे हा कार्यकम हाती घेण्यात आला. यावेळी मुलींच्या माता उपस्थित होत्या.ग्रूप ग्राम पंचायत माजगांव  सरपंच गोपीनाथ जाधव यांनी सुकन्या समृद्धी योजनांतून खाते खोलून पहिल्या हप्ताचे पैसे त्यांनी स्वता भरले.यावेळी सुकन्या समृद्धी योजनेंची माहिती देण्यासाठी सहाय्यक अधिक्षक डाक घर नवी मुंबई विभाग पनवेल – नावडे यांनी आता मुलींच्या नावे खाते काढल्यांने भविष्यात शिक्षण आणि लग्नांचा खर्चासाठी आपल्याला खूप मोठी मदत होईल अशा योजनेची महिती सांगितली.    

त्याच बरोबर ग्रामीण डाक सेवा – अशोक खोपडे जी.डी.एस खालापूर – अविनाश खंडागळे यांनी सुद्धा सुंदर असे मनोगत व्यक्त केले. पोस्टमन – संदिप गायकवाड ,उपस्थित मान्यवर म्हणून  ग्रामसेवक संदिप धारणे , राजिप शाळा माजगांव शिक्षिका अंजली विचारे,नंदा पाचपिंडे,रेखा जाधव,सदस्या – कल्पना वाघे,ग्रामस्थ – नामदेव वाघे ,वसंत कांबळे आदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.