सिध्दिविनायक मंदिर समितीवर आगरी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे — सूर्यकांत पाटील
सिटी बेल • पेण • वार्ताहर •
मुंबई मध्ये आगरी समाज पुर्वी पासुन वास्तव करीत असताना येथील असणा-या देऊबाई पाटील यांनी मुंबईच्या प्रभादेवी येथे श्री सिद्धिविनायक मंदिराची १८०१ साली स्थापना केली. मात्र या मंदिर समितीवर मागच्या अनेक वर्षांपासून बाहेरील परप्रांतीयांची नियुक्ती होत आहे.मात्र मंदिर आगरी समाजाचा असल्याने या समितीवर आगरी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे असे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत सदर संस्थेने वारंवार शासनाकडे निवेदन दिले आहे.मात्र शासन याकडे कानाडोळा करीत आहेत.१९८० साली शासनाने श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट ची स्थापना केली त्यावेळी या समितीवर काही काळ आगरी समाजाचे नेते माजी मंत्री लिलाधर डाके हे अध्यक्ष राहिले परंतु त्यानंतर या समितीवर इतर परप्रांतीयांची नेमणूक केली जात आहे मात्र आगरी समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही त्यामुळे शासनाने आमचे दोन प्रतिनिधी या समितीवर घ्यावे अन्यथा येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून जन आंदोलन उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला निवृत्त अभियंता पी.वाय.पाटील, सहखजिनदार धुरंधर मढवी, निवृत गटविकास अधिकारी द्वारकानाथ वर्तक, पेण तालुका उपाध्यक्ष गजानन भोईर, प्रसिद्ध प्रमुख सुभाष म्हात्रे, प्रकाश माळी आदिंसह इतर सदस्य उपस्थित होते.








Be First to Comment