“केमिस्ट असोसिएशन उलवे” तिसरा वर्धापन दिन” सोहळा दिमाखात संपन्न
सिटी बेल • उलवे •
केमिस्ट असोसिएशन उलवे या संस्थेचा तिसरा वर्धापन दिग सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रविशेठ पाटील (अध्यक्ष, साई देवस्थान मंदिर, वहाळ), डॉ. विलासराव कदम (मा. नगरसेवक, डायरेक्टर ऑफ भारती विद्यापीठ इन्स्टिटयूट नवी मुंबई) तर विशेष अतिथी म्हणून सौ. हेमलता भगत (मा. सरपंच गव्हाण ग्रामपंचायत), अॅड. सौ. प्रतिभा पाटील (कायदेशीर सल्लागार, केमिस्ट असोसिएशन उलवे), शशिकांत रासकर (मा. अध्यक्ष, नवी मुंबई केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन) उपस्थित होते.
यावेळी उलवेतील औषध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार आणि पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचानाची जबाबदारी असोसिएशनचे खजिनदार रितेश वाघमारे आणि सौ.आरती शर्मा यांनी पार पाडली. औक्षणाची जबाबदारी सौ. शर्मिला ठाकूर, सौ. प्रियांका वाला, सौ. संगीता रौनीयर, सौ. धनश्री शिंदे, सौ. छाया भास्कर यांनी पार पाडली.
कार्यक्रमाचे नियोजन सौ. किरण गोविंद जाधव (उपाध्यक्षा, केमिस्ट असोसिएशन उलवे), गोविंद जाधव, तुकाराम पडाळे आणि सुनील ठाकूर यांनी पार पाडली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्व सदस्यांचे केमिस्ट असोसिएशन उलवे च्या अध्यक्षा सौ. सीमा सुभाष पाटील यांनी आभार मानले.
Be First to Comment