Press "Enter" to skip to content

आजी आजोबांना दिले प्रिती भोजन

सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमास भेटवस्तूंचे वाटप

सिटी बेल • खांब-रोहे • नंदकुमार मरवडे •

अंशुल कंपनी चे एच आर मॅनेजर व भाटे सार्वजनिक वाचनालय रोहाचे विद्यमान अध्यक्ष किशोर रविंद्र तावडे यांनी त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री. काळकाई प्रसन्न व्रुद्धाश्रमास भेट देऊन वस्तू रूपात मदत केली व आजी आजोबांना प्रिती भोजन दिले.

किशोर रविंद्र तावडे यांनी त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला. तर आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी तालुक्यातील संभे येथील असलेल्या व संचालिका सुनंदा मोहिते आणि त्यांचे सर्व सहकारी चालवित असलेल्या
श्री. काळकाई प्रसन्न व्रुद्धाश्रमास भेट देऊन आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

याप्रसंगी संचालिका सुनंदा मोहिते यांनी आमच्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे. तुम्ही दिलेलं स्नेह आणि प्रेमामुळे आमच्या आज्जी आजोबांना आपली भावनिक जवळीक झाली व तुमचे प्रेमळ सहवास आम्हाला खूप काही देऊन गेलं.अशाप्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. तर हा योग जुळून आणण्यात सुरेश मेथा यांचे महत्त्व पुर्ण योगदान लाभले.त्यांनी घेतलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले. तसेच नगरसेवक महेंद्र गुजर यांनीही उपस्थिती नोंदवून सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.