गुरव समाजाच्या रायगड ठाणेसह मुंबई संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन
सिटी बेल • पेण • वार्ताहर •
महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 लाखापेक्षा अधिक गुरव समाज वास्तव्य करत असून बारा बलुतेदारांपैकी ओबीसी समाजातील हा एक घटक आहे.गुरव समाज गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे भक्तिभावाने मंदिरामध्ये पूजा-अर्चा, दिवाबत्ती नारळ फुले विक्री, करून आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करीत आहेत.
आज गेली अनेक वर्ष समाजाचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सुद्धा आज पर्यंत गुरव समाजाला न्याय मिळाला नाही.त्यामुळे येत्या 27 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता पेण येथील पी.के.रिसाॅट सावरसई येथे रायगड ठाणेसह मुंबई संस्थेची सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या सभेला खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, कार्यकारी मंडळ, संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश (काका ) राजगुरव, कार्याध्यक्ष-विजय साळुंखे, सुरेश गुरव, सेक्रेटरी उमेश खंडागळे, खजिनदार भाऊ दळवी, यासह संस्थेतील सर्व उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सहखजिनदार,खजिनदार, सर्व कार्यकारणी सदस्य व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तेव्हा सर्वांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन बंडू खंडागळे यांनी केले आहे.








Be First to Comment