Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवे यांचे विशेष प्रयत्न

पाली भूतीवली लघु पाटबंधारे योजने करीता ९७ कोटी रुपयांची तरतूद !!!

सिटी बेल • कर्जत •

कर्जत तालुक्यातील पाणी साठ्याच्या दृष्टीकोनातून पाली भूतीवली धरण हे खूप महत्वाचे धरण आहे. सदर धरण हे जवळपासच्या गावांसाठी व कर्जत तालुक्यासाठी महत्वाचे असून सदर योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत. या संदर्भात दिनांक २९ जानेवारी २०२१ रोजी आमदार महेंद्र यांनी पाहणी दौरा आयोजित केला होता.

पाली भूतीवली धरणाच्या कालवे बांधणी करीता निधीची मागणी आमदार महोदयांनी केली होती याच आधारावर महाराष्ट्र राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत धरणाच्या अपूर्ण कामांकरिता ९७ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

या निधीच्या तरतुदी मुळे पाली भूतीवली धरणाची अपूर्ण कामे मार्गी लागणार असून या पाण्याचा फायदा शेतीसाठी, सिंचनासाठी व पिण्यासाठी होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.