नवाब मलीक यांच्या अटकेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला पनवेलच्या छत्रपती शिवाजी चौकात निषेध
पहा काय म्हणतात महाविकास आघाडीचे नेते 👇
सिटी बेल • पनवेल •
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याने महाविकास आघाडीत तीव्र संतापाची भावना आहे. केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून भाजप करीत असलेली हुकूमशाही महाविकास आघाडीचा कार्यकर्ता सहन करणार नाही हा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, पनवेल महापालिका काॅंग्रेस जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकाप पनवेल विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष काशीनाथ पाटील, काँग्रेसचे पमपा जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित पां. पाटील, शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे,राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पमपा जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, काँग्रेस पमपा जिल्हा सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड, काँग्रेस पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, शेकाप पमपा जिल्हा चिटणीस व नगरसेवक गणेश कडू, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक, युवक काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, शिवसेनेचे रामदास पाटील, शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, रायगड जिल्हा समन्वयक दीपक निकम, माजी नगरसेवीका निर्मला म्हात्रे, माजी नगरसेवीका शशिकला सिंग, माजी नगरसेवक अतुल पलन, शिवसेना पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, पराग मोहिते, अमिता चौहान, आदई ग्रामपंचायत सरपंच रमाकांत गरूडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment