एका मागून एक विकास योजना राबवत या भागात विकासकामांचा झंजावात सुरुच ठेवणार : राजा केणी
सिटी बेल • अलिबाग •
जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघातील कुर्डुस ग्रामपंचायत हद्दीतील कुर्डुस ते नवखार रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन बुधवार (दि.23) रोजी रायगड जिल्हापरिषदेच्या गट नेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते झाले. एका मागून एक विकास योजना राबवत या भागात विकासकामांचा झंजावात सुरुच ठेवणार असल्याचे प्रतिपादन अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांनी यावेळी केले.

आरोग्य, शिक्षण, पाणी योजनाबरोबरच दळणवळण सुलभ व्हावे यासाठी रस्ते दुरुस्तीचीही कामे शिवसेनेच्या माध्यतातून सुरु आहेत. मागिल अनेक वर्ष रखडलेल्या कुर्डुस ते नवखार रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर बुधवारी काम सुरु करण्यात आले. विक्रमी वेळेत हे काम पुर्ण करणार असल्याचे राजा केणी यांनी यावेळी सांगितले.

विकास कामांचा रखडलेला मार्ग शिवसेनेच्या रुपाने खुला झाला असून पुढील कालावधीतही येथे सर्वसामान्यांच्या सुखसोयीसाठी विविध योजना राबविण्याचा संकल्प राजा केणी यांनी मांडला आहे. या भागातून निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने येथे पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या सारख्या सुविधांची दुरवस्था झाली होती. या विकासकामांमुळे कुर्डुस मतदार संघात राजा केणी यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. या जोरावर आपण कुर्डुस मतदार संघात हमखास विजय मिळवू, असा दावा राजा केणींनी केला आहे.

यावेळी माथाडी कामगार तालुका प्रमुख आप्पा पिंगळे, शिवसेना विभाग प्रमुख योगेश जुईकर, ग्रामपंचायत सदस्या छाया पिंगळे, संपर्क प्रमुख शैलेश पाटील, कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य उत्तम शेठ पाटील, जीवन पाटील, , दिपक पाटील, मोहन पिंगळे, सुर्यकांत केणी, सुर्यकांत पिंगळे मोहन पाटील अभिजीत पिंगले अभिषेक पाटील किरण पाटील तसेच शिवसेना शाखा प्रमुख उप शाखा प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment