Press "Enter" to skip to content

शिक्षक वर्गांचे किल्ले सोंडाई येथे स्वच्छता अभियान

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

चौक – कर्जत महामार्गावरील बोरगांव फाटा गावानजिक असलेले सोंडाई किल्ले स्वच्छता करण्यासाठी तसेच या किल्यांचा आभ्यास आणी किल्याचा पुर्व इतिहास जाणुन घेण्यासाठी शिक्षक वर्गांनी या ठीकाणी जावून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.शिक्षक विद्यार्थ्यांना घडवित असतांना एक पाऊल पुढे टाकत स्वच्छता राबविली आली.आज तरुणांन गड किल्यांची महती समजली आहे.आपण किल्यांचे सवर्धन केले पाहिजे.तरच भावी पिढिला या किल्यांची माहीती मिळेल.

जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या आणि संघटनेचे विविध पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सोंडाई किल्ला येथे जाण्याचा प्रयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील ९० शिक्षकांनी सहभाग घेतला.या भागातील बोरगाव ग्रामपंचायत सरपंच प्रितेश मोरे यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले व जि.प.सदस्य ठोंबरे यानी सर्व शिक्षकांस जेवनाची व्यवस्था केली.

आपल्या महाराष्ट्राला आनेक किल्यांचा इतिहास लाभला आहे.आज काही किल्यांची अवस्था बिकट होत चालली आहे.तर काही किल्ले नामशेष होत चालले आहे.ते सांभाळले पाहिजे तेव्हाच तेव्हा ख-या अर्थाने आपण शिव भक्त आहोत यांची जाणीव होईल.मात्र काही पर्यटक किल्यावर येत असतात मात्र या किल्यावर जाताना साहित्य घेवुन जात असतात मात्र येताना आपण आनलेले साहित्य तेथेच टाकुन देत असातात.ही वस्तु स्थिती निर्माण झाली आहे.

मात्र आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे की आपण या किल्यांचे सवर्धन करता नाही आले तर करु नये मात्र कचरा टाकु नये.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पशाने पावन झालेले हे किल्ले आज आपण तिथे अस्वच्छता करीत आहोत.अशी खंत शिक्षक वर्गांनी व्यक्त केली यांनी व्यक्त केली.या किल्ले स्वच्छता मोहिमेत जितेंद्र ठाकूर,संदीप पाटील,राजेंद्र फुलावरे, मस्तान बोरगे, श्रीधर शेंडे,संदीप पोटफोड़े, चंद्रशेखर शिंदे, संतोष निघोट,अमित मिडगुले,महेश म्हात्रे,अशोक खेड़कर, बालू भालसिंग, सर्व उपस्थितांचे संदीप सुर्वे यानी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.