जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी व्हील चेअर देवून जोपासली सामाजिक बांधिलकी
सिटी बेल • पनवेल • वार्ताहर •
शिवसेनेच्या 80% समाजकारण व 20% राजकारण या धोरणाप्रमाणे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी एका मुलाला व्हील चेअर देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाने कु. प्रवीण सरोज जैसवाल रा. कळंबोली यांना व्हील चेअर देण्यात आली. एक आधार असावा असे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यामार्फत नेहमी गोरगरिबांना मदतीचा हात दिला जातो.
यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांच्यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी जैसवाल कुटुंबियाांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
Be First to Comment