सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
रसायनी परिसरातील सावळे गावचे सामाजिक कार्यकर्ते मारुती माळी (एन.डी.माळी) यांची गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान मारुती माळी यांनी सामाजिक बांधिलकी जपत विकासकामे केल्याने त्याची नागरिकांनी त्यांना पोहोचपावती दिल्याचे दिसून येते.त्यांना वारकरी सांप्रदायाची आवड असल्याने हरिनामाच्या गजरात ते नेहमीच तल्लीन असतात. नुकताच आळंदी येथे कार्य गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांची रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले.
यावेळी सरपंच सतिश म्हस्कर, माजी सरपंच बळीराम कांबळे, माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, उद्योजक राम गाताडे, सुनील माळी, प्रभाकर जांभुळकर आदी उपस्थित होते. त्यांची सावळे तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याने मारुती माळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment