Press "Enter" to skip to content

सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सतिश म्हस्कर

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीचा निकाल शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी झाल्याने ग्रामपंचायत विभागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळत गावाच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलून सतिश म्हस्कर यांनी सरपंचपदी बिनविरोध निवडून येऊन बाजी मारली आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सरपंच सतीश म्हस्कर यांचे अभिनंदन आणि कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गावाचा विकास उत्तमरीत्या व्हावा या हेतूने गावातील प्रतिष्ठित व अनुभवी व्यक्तींचा सल्ला आमच्यासाठी मार्गदर्शन ठरणार आहे. तसेच आखलेल्या नियोजनाद्वारे ग्रामपंचायत सदस्यांच्या मतांचा विचार करून प्रत्येक प्रभागातील विकास कामांवर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सरपंच सतीश म्हस्कर यांनी सांगितले आहे. तसेच शासनाच्या ग्रामविकास योजनांचादेखील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही योग्यप्रकारे पुरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या आनंदोत्सवक्षणी शुभेच्छा देण्यासाठी परिसरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सतीश म्हस्कर यांना भेटून पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल आदी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

या क्षणात सहभागी होण्यासाठी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, सावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कांता कांबळे, सदस्य प्रशांत माळी, सुनील माळी, सुरेखा कुरंगळे, रश्मी गाताडे, प्रगती जांभुळकर, माजी सरपंच संतोष माळी, शिवाजी माळी, अविनाश गाताडे, बळीराम कांबळे, एम. डी. माळी, सदाशिव माळी, सीताराम माळी, रामचंद्र माळी, रघुनाथ माळी, परशुराम माळी, अंकुश झिंगे, महादेव जांभुळकर, विजय कुरंगळे, सुदाम भंडारकर, बी. डी. भिंगारकर, निलेश माळी, गाव अध्यक्ष संदीप माळी आदींसह युवा मोर्चा अध्यक्ष ओमकार माळी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र केदारी, रामचंद्र म्हस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.