जाणता राजा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
सिटी बेल • मंजुळा म्हात्रे • पेण •
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना नियमांचे पालन करून पांडापूर येथे उत्सहात संपन्न झाली.
या जयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे किल्ले रायगडा वरून शिवज्योत पांडापूर येथे आणण्यात आली. त्या नंतर महाराज्यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा मिहीर धारकर यांच्या हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.महिलांसाठी स्वसंरक्षनाचे धडे, महिलांचा हळदी – कुंकवाचा कार्यक्रम या मध्ये ५०० हुन अधिक महिलांनी सहभाग दर्शवला.तदनंतर रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांचा शिवजन्मोत्सव सोहळ्यावर मराठमोळा पोवाडा व स्पुर्ती गीतांचा शाहिरी कर्यक्रम याची देही, याची डोळा शेकडो शिवभक्तांना अनुभवायला मिळाला. हे कार्यक्रमाचे यशस्वी करणाऱ्या जाणता राजा प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांचे व महिला पदाधिकाऱ्यांचे जाणता राजा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत दादा फोमन, व रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी आभार मानूण शिवजयंती निमित्त सर्व जनतेस शिवमय शुभेच्छा दिल्या.
या कर्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शशिकांत बगडे महाराष्ट्र उपाध्यक्ष, सुनील जगताप, किशोर मयेकर, विष्णू पाटील , नरेश गावंड , मिहीर धारकर, भरत नेपाळी, गजानन बोरकर,वासुदेव म्हात्रे बी. एन. पाटील सर, देवेंद्र म्हात्रे, डॉ. कामिनी मोकळ, अँड. प्रज्ञा भगत आदी मान्यवरांसह जाणता राजा प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment