Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये मोफत मेघा कॅन्सर तपासणी शिबिर

कर्जतमध्ये आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी काम करणार — प्रिया दत्त

सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •

कर्जत तालुक्यात आरोग्य विषयक काम करण्यासाठी बरेच काम आहे त्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ कर्जत बरोबर मैत्री केली असून यापुढे नर्गिस दत्त फाउंडेशन मिळून काम करु असे प्रतिपादन माजी खासदार प्रिया दत्त यांनी कर्जत येथे केले.

इनरव्हील क्लब ऑफ कर्जत आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने नर्गिस दत्त फाउंडेशन आणि अपोलो कॅन्सर सेंटर यांच्या सहकार्याने कर्जत मध्ये मोफत मेघा कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन नर्गिस दत्त फाऊंडेशच्या प्रिया दत्त यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार सुरेश लाड, प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख, प्रतिक्षा लाड, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा करुणा पराडकर, उपाध्यक्ष उत्तरा वैद्य, सचिव मोनिका बडेकर, खजिनदार पल्लवी सावंत, आय एस ओ शिल्पा दगडे,ज्योत्स्ना शिंदे,किरवली ग्रामपंचायत सरपंच संतोष कांबरी आदी उपस्थित होते.

शिबिराचे उदघाटन करताना प्रिया दत्त याप्रसंगी माजी आमदार सुरेश लाड, अजित नैराळे, विक्रम देशमुख आदी

सचिव मोनिका बडेकर यांनी प्रिया दत्त यांची ओळख करून दिली व त्यांच्या कार्याची माहिती माहिती सांगितली.नर्गिस दत्त फाऊंडेशच्या प्रिया दत्त यांनी ग्रामीण भागात इनरव्हील क्लब ने विशेष म्हणजे मोनिका बडेकर यांनी पुढाकार घेवून हे शिबीर आयोजित केले, त्यामुळे आता त्यांची आणि आमची मैत्री झाली आहे मला कधीही आवाज द्या नर्गिस फाऊंडेशन तुम्हाला साथ देईल असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंतिका गायकर यांनी केले तर उत्तरा वैद्य यांनी आभार मानले.

या शिबिरात कॅन्सर स्क्रीनिंग प्रोस्टेट स्पेसिफिक ऑटीजन टेस्ट सर्व्हिकल पँप टेस्ट, डोके आणि मान स्क्रीनिंग,सीबीसी रक्त तपासणी, सर्वसाधारण तपासणी, तसेच दमा आणि सीओपीडी साठी चाचणी करण्यात आल्या. अपोलो हॉस्पिटल हे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लुपिन चे अल्थमान शेख, नर्गिस दत्त फाऊंडेशनचे समिर कुरेशी, पथॉलॉजी चे मोहिब शेख यांनी तपासणी करून मोफत औषधे दिली दिली, यावेळी 167 जणांनी तपासणी करून घेतली.

याप्रसंगी तन्वी जोशी, साक्षी अडसुळे, सरस्वती चौधरी, मिना प्रभावळकर, शीला गुप्ता, वैशाली दांडेकर, भाग्यश्री शेळके, सुरेखा मराडे, दीपा देशमुख, सुलोचना गायकवाड, सुप्रिया गिरी आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.