Press "Enter" to skip to content

पेण शहरातील राजकारण तापले

पेण नगरपालिका निवडणुकीत यापुढे दडपशाहीचे राजकारण चालू देणार नाही — शिशिर धारकर

सिटी बेल • पेण • वार्ताहर •

मागच्या दहा वर्षेपासून पेण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांवर सत्ताधाऱ्यांनी दडपशाही सुरू केली आहे ती यापुढे चालू देणार नाही असे वक्तव्य शिशिर धारकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले .

शहरातील अनेक विकास कामांबरोबर रिंगरोड आणि जमिनीवर टाकलेले आरक्षण यामधून कोट्यावधी रूपये कमविले असून आपल्या स्वार्थासाठी रवि पाटील राजकारण करीत आहेत त्यामुळे पेणच्या जनतेने यांच्यावर अधिक विश्वास न ठेवता वेळीच सावध होणे गरजेचे आहे.पेण अर्बन बँकेच्या बाबतीत मी स्वतः ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करीत असून सध्या न्यायालयीन लढा सुरू आहे त्यामुळे त्यात अधिक बोलणे उचित ठरणार नाही परंतु पेणकरांना या सर्व गोष्टींचा उलगडा ह्यायाला पाहिजे खोपोली संघर्ष समितीच्या माध्यमातून ठेविदारांनी न लढता पेण अर्बन बँकेचे मुख्य ठिकाण पेण असल्याने पेणकरांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे.

संघर्ष समिती ठेविदारांच्या हिताचे काम करीत नाही ज्या रवि पाटीलांचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी चार दिवस अगोदर सांगितले की अर्बन बँकेत माझे १० लाख रुपये अडकले आहेत ते शिशिर धारकर यांनी पहिले द्यावे आणि नंतरच बॅकेंबाबत बोलावे मात्र हे धादांत खोटे असून २३ सप्टेंबर २०१० ला अर्बन बॅक बंद झाली मात्र त्या अगोदरच १७ सप्टेंबरला १ लाख ४३ हजार, १९ सप्टेंबरला ५ हजार, २६ आणि २७ ला एक एक हजार काढले असे असून आता त्यांच्या खात्यात १ हजार ९६५ रुपये आहेत त्यामुळे रवि पाटीलांच्या माणसांना याबाबतची अगोदरच कानकून लागली होती त्यामुळे यांचेच हात यात असतील असाही आरोप त्यांनी यावेळी लगावला.

तर बॅकेत माझ्या कुटुंबाचे ३ कोटी ५९ लाख रुपये अडकले मग मला जर माहिती असती तर ते आम्ही अगोदरच काढले असते मात्र पेणकरांना मी कदापीही फसविणार नाही याउलट रवि पाटील जनतेची दिशाभूल करीत आहेत.तर सत्ताधाऱ्यांनी पेणला भकास केले असून आपण पेणचे पुणे करणार आहोत. शहरातील अंडरग्राऊंड गटारे, भुमिगत विद्युत लाईन, भाजी मार्केट यासह शहरात भरणारा बाजार या सर्व गोष्टींमध्ये हे सत्ताधारी पैसेच कमवित बसले आहेत.स्वताच्या बंगल्यात दिवसभर पाणी मात्र पेणकरांना दिवसातून एक वेळ हा कुढला न्याय त्यामुळे पेणकरांच्या हितासाठी मी झटणार असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला बाजूला ठेवून सर्वांना बरोबर घेऊन निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला ध्वजा गोरखा, भरत बडेला, संदिप मोने आदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.