Press "Enter" to skip to content

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर

बिर्ला कार्बन कंपनीच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तळवली येथील बिर्ला कार्बन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत एमजीएम हाॅस्पिटलच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्याप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

या शिबिराचे उदघाटन बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट प्रमुख हनुमान गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिर्ला कंपनीचे जनरल मॅनेजर प्रकाश देसाई यांनी केले.या शिबिरात तरुणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी सरनौबत नेताजी पालकर विद्यालयातील शिक्षक, तळवली ग्रामस्थ व कंपनी कर्मचा-यांनी उपस्थिती दाखवून रक्तदान केले.सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी हरीश रावत,सचिन कुंदने, लक्ष्मण मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.