छत्रपती शिवाजी महारांचा आदर्श घेऊन समाजातील जाती पाती नष्ट करा : पोलीस अधिकारी प्रमोद कदम
सिटी बेल • शिहू • प्रतिनिधी •
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अठरापगड जातीचे सैन्य होते.आणि त्या सैन्यांना आदराची आणि आपुलकीची वागणूक छत्रपती देत होते.छत्रपतींच्या राजवटीत जाती पातीचा विचार न करता स्वराज्य रक्षणासाठी सर्व धर्म समभाव या विचाराने सर्वांचा आदर महाराज करत होते.अशा या थोर पराक्रमी राजाचे आपण वंशज आहोत. म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देखील समाजातील जाती पाती नष्ट करून गुण्या गोविंदाने एकोप्याने नांदावे असे परखड उद्गार नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद नरसिंहराव कदम यांनी बौद्धजन समाज सेवा संघ,बेणसे. सम्यक सामाजिक संस्था.बेणसे रजि.महाराष्ट्र ,रमाई महिला मंडळ,सावित्री बचतगट आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,सर्व धर्म समभाव समाविष्ट असलेल्या राज्यघटनेच्या नियमानुसार प्रत्येकाने आपले दैनंदिन कार्य कायदा सुव्यवस्थेचे पालन करून करावेत. सर्व राष्ट्रपुरुष हे सर्वांचे आदर्श असून त्यांना जाती पातीत न ठेवता ते राष्ट्राचे आदर्श म्हणून आपण त्यांना अभिवादन करावे . बेणसे बौद्धवाडी हि आदर्श वाडी असुन सर्व धर्म एकत्र घेऊन सर्व सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवत आहेत.म्हणून बेणसे बौध्दवाडी पूर्ण रायगड जिल्ह्यात आदर्श मानली जाते असे ते शेवटी म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेणसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अ.का.म्हात्रे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून बेणसे ग्रामपंचायत उपसरपंच संतोष पांडुरंग अडसुळे,चंद्रकांत अडसूळे,गजानन कुथे,विनोद इंद्रे, सुनील वेदक, भास्कर पाटील,हरेश वातेरे,सोमनाथ भऊड आदि मान्यवर व महिला मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला त्रीसरण पंचशीलेचे ग्रहण करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित अडसुळे यांनी केले व आभार भावेश भगत यांनी मानले.








Be First to Comment