106 मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेची उघडली खाती
सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
कर्जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील 106 मुलींचे डाक घर मध्ये सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडून पहिला हप्ता भरून त्यांना जन्मदिवसाची आगळी-वेगळी भेट दिली आहे.
प्रत्येक जण आपला जन्मदिवस वेग-वेगळ्या पद्धती साजरा करत असतो मात्र कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील शुन्य ते दहा वर्षाच्या आतील मुलींचे डाक घर (पोस्ट कार्यालयात) सुकन्या समृद्धी योजनाचे खाते उघडून त्याचा प्रत्येकी 250 रुपयांचा पहिला हप्ता भरून त्यांना जन्मदिवसाची भेट दिली आहे.
योजनेमध्ये शून्य ते दहा वर्षाच्या आतील 106 मुलींच्या प्रथम हप्त्याची रक्कम नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी भरती ह्या मुलींचे पुस्तक वितरण समारंभ कर्जत नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, नगरसेविका स्वामिनी मांजरे, संचिता पाटील, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, वैशाली मोरे, डाग विभागाचे पनवेल उपविभाग सहाय्यक अधीक्षक उमेश जनवाडे उपस्थित होते.
थोर पुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सहाय्यक अधीक्षक उमेश जनवाडे आणि कर्जत पोस्टमास्तर जगदीश रूठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिपाली दामोदरे यांनी शुन्य ते दहा वर्षाच्या आतील मुलींचे 250 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत खाते उघडून सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आपण उघडू शकता असे सांगितले.नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दोनशे पन्नास रुपये प्रमाणे कर्जत मधील मुलींची 106 मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेचा पहिला हप्ता भरला त्या पासबुकचे वितरण नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खोपोली शिळफाटा येथील दिपाली गायकवाड यांनी एक हजारच्या वर आधार कार्ड लिंक केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पनवेल उपविभाग सहाय्यक अधिक्षक उमेश जनवाडे यांनी नगराध्यक्ष जोशी यांच्या मुळे आम्ही हा टप्पा गाठला आहे त्याचे विशेष आभार डाकघर विभाग मानत आहे. मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी सर्व खेड्यापाड्यात पोस्ट ऑफिस कार्यालय आहे,सर्वसामान्य नागरिकांना सेव्हिंगचे ज्ञान नसते नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी सुकन्या समृद्धी योजनेची पहिला हप्ता भरून आपल्या मुलीचे खाते उघडले आहे मात्र आपण सर्वांनी पुढील हप्ते भरून हे खाते चालू ठेवायचे आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असे सांगितले.नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी मुलींच्या भविष्याचा विचार करून डाक विभागाने ही योजना काढली आहे, या योजनेचा पहिला हप्ता मी भरला आहे मात्र पुढील हप्ते आपण न चुकतात भरा त्यामुळे आपल्याला सेव्हिंगची सवय लागेल असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक खोपडे यांनी केले.
याप्रसंगी केतन जोशी, माजी नगरसेवक दिपक मोरे, संदीप भोईर, सुनिल ठाकूर, अरविंद नातू, भूषण बडेकर, पंढरीनाथ खडे, श्रद्धा मोहरे, गणेश पार्टे, अंकुश डांगरे, सागर देशमुख, नितीन जाधव, आनंद कडव यांच्या सह डाक घर , नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment