युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर यांच्या तर्फे पळसदरी येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना भांडी वाटप
सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
खालापूर तालुक्यामधील ग्रामीण जांबरुंग खेडेगावातील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा युवासेना चिटणीस प्रशांत खांडेकर यांनी आपल्या वाढदिसाचे औचित्य साधून वायफळ खर्च न करताना सामाजिक उपक्रम हाती घेत पळसदरी येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना भांडी वाटप करून मदतीचा हात दिल्याने प्रशांत खांडेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक होत असून यावेळी वृद्धांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाले .
याप्रसंगी खालापूर पंचायत समिती माजी उपसभापती श्यामभाई साळवी, माणकीवली सरपंच चंदन भारती, ग्रामपंचायत विभागप्रमुख राजेंद्र देशमुख, शाखाप्रमुख विष्णू ठोंबरे, युवासेना नेते गिरीश जोशी, अमोल पाटील, प्रविण भालेकर आदीप्रमुख उपस्थित होते.
खालापूर तालुक्यात कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे असताना काळात गोरगरीबांना मदतीचा हात मिळावा म्हणून शासन स्तरासह सर्वच स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आल्या असताना शासनाला सहकार्य व्हावे आणि गोरगरीबांना मदत मिळावी म्हणुन सामाजिक कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा युवासेना चिटणीस प्रशांत खांडेकर यांनी अनेकदा विविध माध्यमातून गोरगरिबांना मदतीचा हात देत सामाजिक बांधीलकी जपली होती.
तोच सामाजिक कार्याचा वसा पुढे कायम ठेवून प्रशांत खांडेकर यांनी आपल्या वाढदिवसादीनी वायफळ खर्च न करता तोच खर्च सामाजिक कार्यासाठी वापरला असून या दिवशी पळसदरी येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना भांडी वाटप करून मदतीचा हात दिल्याने प्रशांत खांडेकर यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.








Be First to Comment