Press "Enter" to skip to content

आक्षी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन

गोरगरीब जनतेची सेवा या शाखेतून सेवा घडावी :- आमदार महेंद्र दळवी

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन •

अलिबाग तालुक्यातील आक्षी गाव हे तालुक्याच्या ठिकाणापासून नजीक असलेले गाव आहे.या गावातील तसेच आसपासच्या गोरगरीब जनतेची सेवा या शाखेतून सेवा घडावी असे प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी आक्षी येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी उपस्थित शिवसैनिक यांना संबोधित असताना आमदार दळवी यांनी सांगितले की,या ग्रामपंचायत सहित या विभागातील लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत असून त्याच प्रमाणात नागरी समस्या, जनतेचे प्रश्न देखील वाढत आहेत. ते सोडविण्यासाठी या शाखेचा निश्‍चितपणे उपयोग होईल. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे कामाचे सूत्र असून त्यानुसार येथून कामे होतील, आणि शाखेत मदत मागण्यासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती हा आनंदाने गेला पाहिजे.मदत मागण्यासाठी येणारा व्यक्ती हा कुठल्या पक्षाचा आहे हे न पाहता त्याचे काम करा.यातूनच पक्ष वाढीसाठी मदत होईल.

वरिष्ठांचे आदेश आले तर शिवसेना पक्ष वाढीसाठी व आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हि संकल्पना आम्ही हाती घेतली आहे. शिवसेना सदस्यांनी कोरोना काळात झालेले लसीकरण व रेशन दुकानातून गोरं गरिबांना धान्य मिळाले का याचा आढावा घेणे, जनतेच्या अडचणी सोडविणे, तसेच गावातील काही अडचणी असतील त्या आमच्या पर्यंत पोहचविणे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देता येईल. आपण बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. आपण गट, तट न पाहता शिवसेनेसाठी काम करायचे आहे असेही सांगितले.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांचसहित आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
आक्षी येथील शाखा होण्यासाठी अलिबाग मुरूड चे आमदार महेंद्र दळवी यांच्या सूचनेनुसार तसेच रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्षी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकर गुरव यांच्या पुढाकाराने बांधण्यात आली असल्याचे आक्षी माजी सरपंच शंकर गुरव यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.