सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत नगरपालिका हद्दीतील लवजी गावात अकॅडमी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला छोट्या वक्त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. पहिल्या गटात सिद्धी बांदल (निगडोली ) खालापूर हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक कर्जतच्या सिद्धी बडेकर हिने पटकाविला. दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक तन्मय देशमुख (खोपोली) द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली कर्जतची श्रुती कुंभार.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून शिवव्याख्याते आकाश घरडे, मुंबई पोलीस दलातील कल्पेश गुरव ,निवृत्त सैनिक संभाजी कांबळे, तसेच पत्रकार जयवंत माडपे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले ,त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आले.दरम्यान उपस्थितांना कल्पेश गुरव, आकाश घरडे ,या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी ॲकॅडमी चे प्रमुख निखिल थरकुडे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्प देऊन स्वागत केले. नंतर त्यांनी अकॅडमीच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्याना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके देण्यात आली.छोटे शाहीर शौर्य निंबाळकर यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांनी भरभरून दाद दिली.शेवटी आभार प्रदर्शन निखिल थरकुडे यांनी केले.








Be First to Comment