सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कांबे गावामध्ये शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .
सकाळी प्रतिमापूजन , आरती , शोभायात्रा व अभिषेक असे या उत्सवाचे स्वरूप होते . विशेष यानिमित्ताने ग्रामस्थ तरुण मंडळ यांच्यातर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेमध्ये पारंपारीक गणवेश परिधान करून आबालवृद्धांनी उपस्थिती दर्शविली .

कु . बिली म्हात्रे हिने साकारलेली शिवरायांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली.इतर सहकाऱ्यांनी मावळ्यांच्या गणवेशामध्ये कांबे गावातून मिरवणुक काढली.शिवरायांच्या गीता या शोभायात्रेमध्ये ‘ गावातील सर्वच स्तरातील मान्यवर सहभागी झाले होते .
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कांबे गावातील तरुण युवकांनी विशेष पुढाकार घेतला .








Be First to Comment